बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा हा चित्रपट आज जी गर्दी खेचतो आहे त्यावरून बाई असण्याच्या व्यथा किती प्रकारच्या असू शकतात अन् प्रत्येक स्त्री त्याशी किती relate करू शकते याचा प्रत्यय येतो…!!! सिनेमा नक्कीच आवडण्यासारखा आहे.. कारण..
आज प्रत्येक वयोगटातील स्त्री ला वेगवेगळया आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
10 ते 20 वयात येताना होणारे hormonal changes..
20 ते 30 लग्न, मूल यातून होणारे hormonal changes 30 ते 40 आयुष्याला स्थैर्य येत असताना होणारे hormonal changes, स्थूलपणा व त्यातून येणारे Thyroid, Diabetes सारख्या आजारांची सुरूवात…
40 ते 50 peri menopause ते menopause अशा प्रवासाशी संबंधित समस्या..त्यातून येणारे Arthritis , osteoporosis सारखे शारीरिक आजार व mood swings यांची मालिका सतत चालू असते.
मासिक पाळी अन् त्याच्याशी संबंधित highs and lows चा roller coaster सतत सुरूच असतो.
म्हणूनच यावेळी exclusively स्त्रियांमध्ये होणाऱ्या विकारांवर कॅम्प घ्यायचे ठरवले. कारण असे कितीही त्रास होत असला तरी लगेच doctor कडे approach न होता त्रास अंगावर काढायची स्त्रियांची मानसिकता असते. कॅम्प च्या निमित्ताने किमान त्यांची वेळेवर तपासणी व औषधोपचार केले जावे हा उद्देश…!!
सध्या ज्वलंत असलेली PCOD किंवा PCOS ही समस्या..
Fast life..fast food… हे याचे प्रमुख कारण…
खरं तर आयुर्वेदात या आजारांचे मूळ कारण रसदुष्टी सांगितलेले आहे. म्हणजे आपण जो आहार ग्रहण करतो, त्याचे पहील्या धातूमध्ये होणारे परिणमन कसे होते आहे यावर आपले आरोग्य अवलंबून असते. म्हणून आहार योग्य असणे हे या विकारांत अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रमाणे योग्य वेळी औषधोपचार सुरू करणे, पंचकर्म चिकित्सेव्दारे शरीरशुद्धी करणे आवश्यक आहे. योग्य व्यायाम, योग, प्राणायाम यांचा दिनचर्येत समावेश असावा.
अन् या संबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठीच शिबीर आयोजित करण्यात आले.
यात मोफत रूग्ण तपासणी व 15 दिवसांचे औषध मोफत देण्यात आले. आवश्यक रक्त तपासण्या अल्प दरात करण्यात आल्या. ज्या रुग्णांनी मुसळधार पावसातही उपस्थिती दर्शवली त्यांचे व माझ्या assistants चे मनःपूर्वक आभार..!
श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु…🙏🏻🙏🏻
©डॉ. श्वेता कुलकर्णी (एम्.डी.आयुर्वेद, एम्.ए.संस्कृत)
श्री विश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय, डोंबिवली.
संपर्क – 9404216580
