गोकर्ण औषधी वनस्पती

गोकर्ण

©Dr. Shweta Kulkarni (M.D.Ayurveda, M.A. Sanskrit)
ShreeVishwa Ayurveda and Panchkarma Chikitsalalay.
9404216580
*दैनंदिन वापरातील औषधी वनस्पती*
*गोकर्ण*
*गोकर्णाला आयुर्वेदामध्ये “अपराजिता” असे अतिशय सुंदर नाव दिलेले आहे. त्याचप्रमाणे सुपुष्पी, गिरीकर्णिका,
विष्णूक्रांता अशा विविध नावांनी ही वनस्पती ओळखले जाते.
या वनस्पतीला जांभळ्या रंगाची फुले येतात व ती गायीच्या कानासारखे दिसतात त्यामुळे हिला गोकर्ण असे नाव पडले आहे.*
गोकर्ण वेली आपल्या सगळ्यांच्या घरातच आढळून येतात खूप मोठ्या प्रमाणावर ही वनस्पती आपल्या इथे दिसून येते.
गोकर्ण चा अजून एक प्रकार आहे तो पांढऱ्या फुलांचा असतो.
फुले अतिशय नाजूक असतात. हिच्या शेंगा लांब असतात व प्रत्येक शेंगेच्या आत चार ते पाच बिया असतात आणि बिया ओल्या मातीत घातल्यानंतर पुन्हा नवीन वनस्पती उगवते.
महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडते.
•आयुर्वेदात या वनस्पतीचे गुण वरूक्ष लघु असे सांगितले आहेत.
•ही चवीला कडू आहे आणि प्रकृतीने ही थंड आहे.
या वनस्पतीचे उपयोग बघूया=
••बाह्य उपयोग –
•कानाभोवती येणारी सूज त्याचप्रमाणे तिथल्या गाठी जर मोठ्या झाल्या तर त्यावर या वनस्पतीची पाने सैंधव मीठा सोबत वाटून त्याचा लेप करतात.
•सध्या लहान मुलांमध्ये जो विकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तो म्हणजे गळ्यातील गाठी वाढणं ज्याला Tonsillitis असे म्हणतात त्यावर या बिया मधात उगाळून त्याने गळ्यावर लेप लावल्यास खूप चांगला लाभ होतो फक्त उगाळताना अतिशय बारीक fine paste गंध झाले पाहिजे अशी काळजी घ्यावी लागते.
•श्वसनसंस्था –
•या वनस्पतीच्या मुळाचा रस आणि थंड दूध एकत्र घेतल्यास कफाचे बेडके पडण्यास उपयोग होतो.
•मलावष्टंभ – पोट साफ न होणे –
•पोट साफ होत नसल्यास या गोकरणाची बी गरम पाण्यासोबत घेता येते त्याचप्रमाणे मुळाचे चूर्ण घेता येते, या वनस्पतीने मुरडा येण्याची शक्यता असते त्यासाठी त्यासोबत सुंठ घ्यावी.
•गंडमाला –
•गंडमालावर याच्या मुळाचे चूर्ण पोटातून घेता येते.
•लघवीला आग होणे
•या वनस्पतीच्या बिया तसेच मुळांचा काढा हा मूत्रमार्गातील जळजळ थांबते.
•अतिशय घाम येणे
•याला आयुर्वेदात अतिस्वेदप्रवृत्ती असे म्हणतात ज्यांना घाम जास्त येतो त्यांनी गोकर्णच्या पानाचा रस आल्याच्या रसात एकत्र करून घेतल्यास घाम बंद होण्यास मदत होते.
•मात्रा –
•भाजलेल्या बियांचे चूर्ण दोन ते चार ग्रॅम घ्यावे मुळाचे चूर्ण तीन ते सहा ग्रॅम घ्यावे.
अशी ही सहजपणे मिळणारी वनस्पती आयुर्वेदात ‘त्रिदोषशामक’ अशी सांगितलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या आजारात आपण या वनस्पतीचा उपयोग करू शकतो.
हिच्या फुलांचे पाणी प्राशन करण्यास सांगितले आहे त्याने पोट आणि मन दोन्ही शांत राहते.
© डॉ. श्वेता कुलकर्णी (एम्. डी. आयुर्वेद, एम्. ए. संस्कृत)


Follow our YouTube channel for more Ayurveda information:


https://youtube.com/@shreevishwaayurvedpanchakarmac



Follow our Facebook page for more Ayurveda posts:


https://www.facebook.com/profile.php?id=100076368301832&mibextid=ZbWKwL

Join our WhatsApp chat group for more Ayurveda posts:


https://chat.whatsapp.com/KYccEO82noQ2KPcQgTGret

Follow us on Instagram :


https://instagram.com/shreevishwa.ayurveda?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay, Dombivli.
Contact number – 9404216580

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Categories

Discover more from Ayurveda Digital World.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading