By

Published on

आपल्या थोरपणासाठीं । अच्यावाच्या तोंड पिटी । न्याये नाहीं ते सेवटी । परम अन्याई ।।

।। दास-वाणी ।। 
आपल्या थोरपणासाठीं । 
अच्यावाच्या तोंड पिटी । 
न्याये नाहीं ते सेवटी । 
परम अन्याई ।। 
येकेकडे अभिमान उठे । 
दुसरीकडे उदंड पेटे । 
ऐसे श्रोते खरे खोटे । 
कोण जाणे ।। 
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/१०/३१-३२ 
स्वत:चे पांडित्य पाजळण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी
हे विद्वान भरसभेत वाट्टेल तसा तोंडाचा पट्टा 
चालवत असतात.
आपण ऐकायला आलोय. निरूपण द्यायला नाही.
याचाही विसर पडल्याने निरूपणात वाद घालून
ते सभेचा नियम तर मोडतातच, परंतु इतर
श्रोत्यांवरही फार मोठा अन्याय करतात.
एका बाजूला ज्ञानाचा अहंकार आपली अक्कल
पाजळत असतो तर दुसरा कोणी विरोधी मताचा
आग्रही त्याच्या विरोधात पेटून उभा राहतो.
यामधे खरा कोण खोटा कोण हे कधीच कळत नाही.
सभेचा मात्र विचका होतो हे नक्की.
तुटे वाद संवाद तो हीतकारी । 
हे मर्म न समजलेले श्रोते हे अवलक्षणीच मानावे.
श्रोताअवलक्षण समास.

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Categories

Discover more from Ayurveda Digital World.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading